भुसावळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने गोर-गरीबांच्या हाताच्या रोजगार गेल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात भुसावळ रेल्वे सुरक्षा बलातर्फे गरजू नागरीकांना मदतीचा हात देण्यात येत आहे. शहरातील नॉर्थ रेल्वे कॉलनी, लिंपस क्लब, यावल नाका, महात्मा फुले नगर, हुडको कॉलनी, जळगाव रोड भागात मदतीचे वाटप करण्यात आले. प्रसंगी ठाकुर्ली मुंबईचे आरपीएसएफ कमांडर अर्जुन राम बिडसर, एएसआय गुरू ईक्बाल, हवालदार अर्जुन सिंह, कॉन्स्टेबल वरुण शर्मा व बी.के.रजक आदी उपस्थित होते.