भुसावळ- लग्नात नाचण्यावरून हाणामारी झाल्याने दोघा भावांना लोखंडी रॉडसह फायटरने मारहाण केल्याची घटना तेली समाज मंगल कार्यालयात 21 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी चौघा भावांसह एकाविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार प्रवीण भगवान चौधरी (पाटीलमळा, रींग रोड, भुसावळ) यांनी बाजारपेठ पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, 21 रोजी नातेवाईकांच्या लग्नानिमित्त वरातीत नाचत असताना संशयीत आरोपींशी वाद झाला मात्र तो वर्हाडींनी सामंजस्याने मिटवला मात्र आपल्यासह भाऊ सचिन चौधरी हे तेली मंगल कार्यालयात बसले असतानाच दुपारी चार वाजेच्या सुमारस संशयीत आरोपी प्रकाश मधुकर चौधरी, प्रवीण मधुकर चौधरी, मनोज मधुकर चौधरी, लक्ष्मण मधुकर चौधरी व विलास जगन्नाथ चौधरी यांनी लोखंडी रॉड व फायटरने दोघा भावांच्या चेहर्यावर तसेच डोळ्यावर मारहाण करून शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दोघा जखमींना गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मनोज ठाकूर यांनी जावून जवाब नोंदवला. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयीतांना अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.