भुसावळात लॉकडाऊनमध्ये व्यवसाय : 18 हजारांचा दंड वसुल

0

पालिका पथकाची धडक कारवाई : मास्क न लावणारेही रडारवर

भुसावळ : शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने 7 ते 13 दरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे मात्र नियम डावलून काहींनी शहरातील दुकान सुरू केल्याने पालिका पथकाने गुरुवारी धडक कारवाई करीत चार व्यावसायीकांसह अन्य तिघांकडून तब्बल 18 हजारांचा दंड वसुल केला. व्यावसायीकांकडे कामाला असलेल्या कर्मचार्‍यांनी मास्क न लावल्याने त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यांनी केली कारवाई
प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ नगरपालिकेच्या पथकाने विशाल मराठे (भाजी विक्रेता बद्री प्लॉट), रीकेश ट्रेडर्स (अंडे विक्रेता, बालाजी लॉन्स समोर), संजय छबडिया (महेश नगर),
न्यू अमणा डेयरी, खडका रोड) या चार व्यावसायीकांसह अन्य तिघांकडून तब्बल 18 हजारांचा दंड वसुल केला. कारवाई करणार्‍या पथकात संजय बाणाईते, पंकज पन्हाळे, सुरज नारखेडे, चेतन पाटील, विशाल पाटील, किरण मनवाडे, अनिल मनवाडे, राजेश पाटील, स्वप्नील भोळे, अरुण सपकाळे, मयूर भोई, दीपक शिंदे, कॉन्स्टेबल चारुदत्त पाटील, किशोर पाटील आदींचा सहभाग होता.