भुसावळात लॉकडाऊन उल्लघंण : 256 जणांवर कारवाई

भुसावळ : लॉकडाऊननंतरही नियमांचे उल्लंघण केल्याने सोमवारी धडक मोहिम राबवण्यात आल्यानंतर 11 विक्रेत्यांविरु गुन्हे दाखल करण्यात आले तर लॉकडाऊन उल्लघंण केल्याने 256 जणांवर कारवाई करीत 68 हजार 800 रुपयांचा दंड वसुल झाला शिवाय रीक्षा चालकांना रीक्षात प्लॅस्टीक कागद/कापड लावण्याचे निर्देश देवूनही त्याचे पालन न केल्याने 92 रीक्षा चालकांकडून 18 हजार 400 रुपयांचा दंड वसुल झाचला शिवाय मोटार व्हेईल अ‍ॅक्टच्या 264 केसेसच्या माध्यमातून 31 हजार 900 रुपयांचा दंड वसुल झाला. विनाकारण फिरणार्‍या 188 नागरीकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. सोमवारच्या कारवाईत एक लाख 20 हजारांचा दंड वसुल करण्यात आला.

मंगळवारीदेखील धडक मोहिम
मंगळवारी पोलिसांनी बाजारपेठ, हंबर्डीकर चौक, शहर पोलिस ठाणे, जामनेर रोड, खडका चौफुली या ठिकाणी मोहिम राबवत दंडात्मक कारवाई केली. सकाळी 11.30 पासून डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी रस्त्यात थांबून येणार्‍या जाणार्‍या वाहनांची कसून तपासणी केली. यावेळी कागदपत्रे नसलेल्या आणि विनाकारण फिरणार्‍या वाहनधारकांना दंड केला. शहर वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक एम.एम. गायकवाड यांनी सहकार्‍यासमवेत जामनेर रोडसह अन्य ठीकाणी थांबून केसेस केल्यात.