भुसावळात लोक अदालतीत 153 खटल्यांचा निपटारा

भुसावळ : शहरातील न्यायालयात शनिवारी लोक अदालतीत दाखल पूर्व 3 हजार 958 खटले तसेच न्यायालयातील 924 खटले ठेवण्यात आल्यानंतर 153 खटले निकाली निघाले. त्यापोटी तीन कोटी 32 लाख 63 हजार 832 रुपयांची तडजोड रक्कम वसुल झाली. अतिरीक्त व जिल्हा सत्र न्यायालयात शनिवारी लोक अदालतीचे आयोजन केले होते. अतिरीक्त जिल्हा सत्र न्या. एस.पी.डोरले यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अदालतीचे कामकाज झालेे. लोक अदालतीत भारती संचार निगम, पालिका, टेलिफोन ऑफिस यांच्यासह अन्य विभागांतील दाखल पूर्व खटले ठेवण्यात आले होते. यावेळी दाखल पूर्व खटले तीन हजार 958 ठेवण्यात आले होते. त्यापैकी 35 खटले निकाली निघाले तर न्यायालयातील 924 खटल्यांपैकी 118 खटले निकाली निघाले. एकूण 153 खटले निकाली निघाले. त्यापोटी तीन कोटी 32 लाख 63 हजार 825 रुपयांची तडजोड रक्कम वसूल करण्यात आली.

यांची लोकअदालतीत उपस्थिती
लोक न्यायालयात तीन पॅनल गठीत करण्यात आले. पहिल्या पॅनलवर न्यायाधीश आर.आर. अहिर होते. त्यांच्या सोबत पंच म्हणून अ‍ॅड.अभिजीत मेने होते. दुसर्‍या पॅनलचे प्रमुख न्यायाधीश व्ही.जी. चौखंडे होते. त्यांच्या सोबत अ‍ॅड. इसरार शेख होते. तिसर्‍या पॅनलवर न्यायाधीश डी.एम. शिंदे होते तेथे अ‍ॅड. स्वप्निल सोनार होते. शनिवारी सकाळी 10.30 वाजता लोक अदालतीचे कामकाज सुरू झाले. अतिरीक्त जिल्हा सत्र न्या.डोरले यांनीही लोक अदालतीच्या कामकाजाची पहाणी केली. यावेळी न्यायालयीन कर्मचारी सतीश पाटील, राहुल पाटील, पी.बी. ठाकरे, किशोर पिंगाणे आदींनी सहकार्य केले.