भुसावळात लोखंडी नट चोरले : तिघांना अटक

0

भुसावळ- लोखंडी नट चोरल्याप्रकरणी तिघा आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. फिर्यादी सुनील शांताराम भोई यांच्या मालकिच्या गोदामाच्या भिंतीला भगदाड पाडून आरोपी कृष्णा किशोर बर्‍हाटे (21), गणेश किशोर बर्‍हाटे (23), सचिन अनिल मोरे (22, सर्व रा.गंगाराम प्लॉट, भुसावळ) यांनी 17 किलो वजनाचे व दोन हजार रुपये किंमतीचे लोखंडी नट लांबवले होती. 24 रोजी रात्री ही घटना घडली होती. तपास हवालदार मो.वली सैय्यद करीत आहेत.