भुसावळ : अॅट्रासिटी कायद्याबद्दल अपशब्द वापरून समाजात तेढ निर्माण असे आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या बुलढाणा मतदासंघांचे आमदार संजय गायकवाड यांचा भुसावळातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी निषेध केला. यावल रस्त्यावरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ बुधवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आले. वंचित संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध
एक लोकप्रतिनिधी म्हणून समाजात असणारे वाद मिटविणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. याचा विसर आमदार संजय गायकवाड यांनी केला नाही. या कृतीचा निषेध व्यक्त करतील वंचीत आघाडीने बुधवारी सकाळी महात्मा गांधी पुतळा भागात आमदार गायकवाड यांच्या प्रतिमेस जोडे मारुन त्यांचा निषेध करण्यात आला. आमदार गायकवाड यांच्यावर कारवाई व्हावी या मागणीसाठी शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनात यांचा सहभाग
आंदोलनात वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, जिल्हा महासचिव दिनेश इखारे, शहराध्यक्ष गणेश जाधव, कामगार आघाडीचे चिटणीस बालाजी पठाडे, तालुका सचिव गणेश इंगळे, तालुका संघटक गणेश रणशिंगे, भुसावळ शहर महासचिव देवदत्त मकासरे, बंटी सोनवणे, विद्यासागर खरात, कुणाल सुरडकर, स्वप्नील सोनवणे, विजय सोनवणे उपस्थित होते.