भुसावळ- भुसावळ न्यायालयात वकीलीचा व्यवसाय करणार्या मतीन सगीर अहमद (49, सिद्धेश्वर नगर, आझाद नगर, खडका रोड) यांचा 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला. 3 रोजी रात्री दिड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मतीन अहमद हे 3 रोजी रात्री दिड वाजेपर्यंत घराच्या पोर्चमध्ये अभ्यास करीत असताना त्यांना झोप लागली. काही वेळानंतर पाऊस सुरू झाल्याने ते घरात जात असताना मोबाईल न आढळल्याने चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार देण्यात आली.