चोपडा । अखिल भारतीय मराठा महासंघाने रविवार 25 डिसेंबर रोजी भुसावळ येथे वधू-वर सूचक मेळावा बियाणी स्कूल आवारात आयोजित केला आहे. त्याच बरोबर मराठा बिझनेसमेन फोरम व जळगाव जिल्हा मराठा महासंघाची जिल्हा बैठकही बियाणी स्कूल येथे आयोजित करण्यात आली आहे. भुसावळ येथील बियाणी स्कूल येथे 9 वाजता वधू-वर नोंदणीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी 10 वाजता बियाणी स्कूल हॉलमध्ये मराठा बिझनेस फोरम, मराठा महासंघ जिल्हा पदाधिकारी यांची बैठक होणार आहे. बैठकीनंतर सकाळी 11.30 वाजता मराठा वधू-वर मेळाव्याचे उद्घाटन अॅड.शशिकांत पवार, राष्ट्रीय अध्यक्ष अ.भा.मराठा महासंघ (मुंबई) यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे मनोगत व्यक्त होणार आहे.
मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
वधू-वर पुस्तिकेचे प्रकाशन राजेंद्र सावंत, अध्यक्ष मराठा बिझनेस फोरम, मुंबई यांच्या शुभहस्ते होणार आहे. तर दुपारी 1.30 ते 2.30 वाजेला भोजन होणार असुन 2.30 ते 4.30 वाजेला वधू-वर परिचय होणार असुन सायंकाळी 5 वाजता सांगता होणार आहे. तरी सदर कार्यक्रमासाठी मराठा समाजातील वधू-वर, पालक यांनी उपस्थित रहावे. त्याच प्रमाणे मराठा उद्योजक बैठकीला मराठा समाजातील जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी व मराठा महासंघाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी दि. 25 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता बियाणी स्कूल येथे उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष किरण देशमुख, उपाध्यक्ष गोविंद पाटील, हिरामण पाटील, महिला जिल्हा अध्यक्षा अनिता मराठे, भुसावळ शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी केले आहे.