भुसावळ- शहरातील जुना सातारा, कोळीवाडा भागातील 62 वर्षीय वृद्धाने तापी नदीपात्रात उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी दुपारी दिड वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. सुधाकर फकिरा कोळी (62) असे मयताचे नाव आहे. सुधाकर कोळी हे गुरुवारी दुपारपासून बेपत्ता असल्याने त्यांचा सर्वत्र शोध सुरू होता तर तापी नदीपात्रातील वाहतूक पुलाखाली पोेल क्रमांक सहा जवळ मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे अरुण उत्तम रंधे (भुसावळ) यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर पोलिसात माहिती दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार अनिल चौधरी करीत आहेत. दरम्यान, रंधे यांनी अनोळखीची ओळख पटवण्याबाबत सोशल मिडीयावरून फोटो टाकून आवाहन केल्यानंतर मृत सुधाकर कोळी यांची ओळख पटली. जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर सायंकाळी उशीरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, नातवंडे असा परीवार आहे.