भुसावळात वर्षी महोत्सवाचा समारोप

0

जनेऊ संस्कारसह विविध धार्मिक कार्यक्रम

भुसावळ- सिंधी कॉलनीतील नानकनगरात बाबा तुलसीदास उदासी साहेब यांच्या 36 व्या वर्षी महोत्सवाचा सोमवारी समारोप झाला. महोत्सवानिमित्त शनिवारपासून तीन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रम झाले. शनिवारी सकाळी श्री अखंड साहेब पाठ वाचनाला प्रारंभ करण्यात आला तर रविवारी सकाळी सिंधी समाजातील 30 मुलांचे सामूहिक जनेऊ संस्कार करण्यात आले. सोमवारी श्री अखंड पाठ साहेब वाचनाची समाप्ती झाली. या कार्यक्रमासाठी सागर, उल्हासनगर, कटनी, मुंबई, उज्जैन, बर्‍हाणपूर आदी भागांतून भाविकांची उपस्थिती लाभली. वर्षी महोत्सवात दररोज सकाळी डॉ.हरीष चावराई यांचा सत्संग झाला तर रात्री तुलसीदास म्युझिकल पार्टी व जय झुलेलाल म्युझिकल पार्टी यांच्या सत्संगाचे आयोजन करण्यात आले.

यांनी घेतले परीश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनीलकुमार बसंतानी, हरेश नैनानी, सुदामा कारडा, कमलेश झुमनानी, हरिश चावराई, मनोज तेजवानी, नारायणदास सिखानी, कन्हैय्यालाल आहुजा, मोटूमल सुंदरानी, सुनील कुकरेजा, रिंकू चेलानी, राजेश देसाई, ज्ञानचंद नैनानी, भगवानदास कुकरेजा, सुनील कारडा, सनी सुभागचंदानी, अमर बालचंद, अर्जून सुंदराणी आदींसह सेवाधार्‍यांचे अनमोल सहकार्य लाभले.