भुसावळात वाळू वाहतूक करणार्‍या डंपस चालकास खंडणी मागितली : एका आरोपीस अटक

भुसावळ : वाळू वाहतुकीचा ट्रक खाली करताना डंपर चालकास चाकूचा धाक दाखवून पाच हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी किशोर उर्फ गोजोर्‍या जाधव यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे तर दुसरा संशयीत पसार झाला आहे. तक्रारदार तथा ट्रक चालक मनोज चंदू कोळी (27, बांभोरी, ता.धरणगाव) हे शनिवार, 17 रोजी 9.30 वाजेच्या सुमारास घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ वाळूचा ट्रक खाली करीत असताना संशयीत आरोपी किशोर उर्फ गोजोर्‍या जाधव व अमोल राणे (दोन्ही रा.भुसावळ) यांनी कोळी यांना चाकूचा धाक दाखवून वाळूच्या रॉयल्टीबाबत विचारणा केली तसेच शिवीगाळ करीत मारहाण केली तसेच नाहाटा चौफुलीपर्यंत पाठलाग करीत पाच हजार रुपयांची खंडणी मागितली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. कोळी यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेत आपबीती सांगितल्यानंतर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहा.निरीक्षक मंगेश गोंटला, सहा.निरीक्षक हरीष भोये यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर किशोर उर्फ गोजोर्‍या जाधव यास अटक करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.