भुसावळ : वाहतूक पोलिसाशी हुज्जत घातल्याप्रकरणी दोघांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला..
बुधवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास शहरातील रजा टॉवर चौकात दुचाकीस्वार (एम.एच.12 डी.जे. 4357) हा ट्रीपलसीट प्रवास करीत असल्याने वाहतूक पोलिसाने वाहन अडवले असता एकाने पळ काढला तर दंडापोटी पाचशे रुपये मागितले असता तौफिक अल्ताफ शेख (रा.चिमटा मोहल्ला, भुसावळ) आणि योगेंद्र राजेद्र पळारे (रा.पाटील मळा, भुसावळ) यांनी शासकीय कामकाजात अडथळा आणून हुज्जत घातली. याप्रकरणी शहर वाहतूक शाखेचे राजेद्र दगडू शिंदे यांच्या तक्रारीवरून उभयंतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलिस निरीक्षक अनिल मोरे, समाधान पाटील पुढील करीत आहेत.