भुसावळात वाहतूक पोलिसाला दमदाटी : कुर्‍ह्याच्या दुचाकीस्वाराला अटक

0

भुसावळ ः दुचाकीवर ट्रिपलसीट प्रवास करूनही कागदपत्रांची विचारणा केल्यानंतर शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍याला धक्काबुक्की व अरेरावी करणार्‍या कुर्‍ह्याच्या दुचाकीस्वाराला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. स्वानंद त्र्यंबक पालोदे (कुर्‍हेपानाचे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

पोलिसाशी एकेरी बोलत दुचाकीही फेकली
जामनेर रोडवरील नाहाटा चौफुलीवर शहर वाहतूक हवालदार प्रवीण पाटील, विनोद फकिरा सपकाळे, श्रीकृष्ण गंगाधरे चाटे हे कर्तव्यार असताना सोमवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी स्वानंद पालोदे हा दुचाकी (एम.एच.19-2003) हा ट्रीपलसीट येत असताना त्यास प्रवीण पाटील थांबवून लायसन्सबाबत विचारणा केली. यावेळी आरोपी माझ्याकडे लायसनस नाही, तुला जे करायचे ते कर, असे एकेरी भाषेत बोलून वाद वाढवत दुचाकी फेकून दिल्याने ही दुचाकी पोलिस कर्मचारी पाटील यांच्या पडल्याने उजव्या पायाला दुखापत झाली तर संशयीत आरोपीसोबत असलेले दोघे पसार झाले. यावेळी वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक के.टी.सुरळकर तेथे आल्यानंतर आरोपीस ताब्यात घेवून त्याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक सारीका वसंत खैरनार करीत आहेत.