भुसावळात वाहने ढकलत काँग्रेसने नोंदवला इंधन दरवाढीचा निषेध

0

भुसावळ : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नागरीक आधीच संकटात असताना व रोजगार हिरावला गेला असताना इंधनाच्या किंमतीत सातत्याने वाढ सुरू असल्याने सर्वसामान्य नागरीकांमध्ये संतापाची लाट आहे. या पार्श्‍वभूमीवर जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी पदाधिकार्‍यांसह शिवसेना तालुकाध्यक्ष समाधान महाजन यांच्या उपस्थितीत पदाधिकार्‍यांनी वाहने पायी लोटत सरकारचा निषेध नोंदवत प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन सादर केले. केंद्र सरकार सातत्याने इंधनाच्या किंमतीत वाढ करून नागरीकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले असून इंधनाच्या दरात

वाहने लोटत इंधन दरवाढीचा निषेध
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री .बाळासाहेब थोरात व जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संदीप पाटील यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय अंभोरे व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यक्रमाचे प्रशिक्षण समन्वयक योगेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत वाहने लोटून आणत इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला. या अनोख्या आंदोलनात जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यक्रमाचे प्रशिक्षण समन्वयक योगेंद्र पाटील, जळगाव जिल्हा काँग्रेस अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, उपाध्यक्ष इस्माईल गवळी, विधान सभा क्षेत्राचे अध्यक्ष इमरान खान, अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार, विजय तुरकेले, कुणाल सुरळकर, विश्वनाथ गायकवाड, सुजाता सपकाळे, मयुर साळवे आदी उपस्थित होते.