भुसावळ : शहरातील के.नारखेडे विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधत प्रकल्पांविषयी माहिती जाणून घेतली. पंचायत समिती सभापती सुनील महाजन, पंचायत समिती सदस्य प्रीती पाटील, नगरसेवक प्रमोद नेमाडे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.