भुसावळ : खडका रोडवरील नवीन ईदगाह डीपीजवळ लाईट दुरुस्तीचे काम करताना संशयीत आरोपी अबरार अहमद शकिल पटेल (26, रा.गौसिया नगर, भुसावळ) यांनी वीज कंपनीचे वरीष्ठ तंत्रज्ञ पंकज कमलाकर पाटील (रा.प्रभात कॉलनी, भुसावळ) यांना मारहाण करीत शिवीगाळ केली होती. 13 डिसेंबर 2020 रोजी ही घटना घडली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत आठ महिन्यांपासून पसार होता. आरोपी सुरत शहरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास क्राईम ब्रँचच्या मदतीने चौक बाजार भागातून अटक करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक रमण सुरळकर, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींनी आरोपीस अटक केली. तपास सहा.निरीक्षक निरीक्षक मंगेश गोंटला, गजानन वाघ करीत आहेत.