भुसावळात वृक्षरोपांच्या लागवडीसह ‘वॉर्ड तेथे शाखा’

0

भारतीय रीपब्लीकन बहुजन महासंघाचा भुसावळात उपक्रम

भुसावळ- पर्यावरण संवर्धनाचा संदेश कार्यकर्त्यांच्या अंर्तमनात रूजवण्यासाठी भारतीय रीपब्लीकन बहुजन महासंघाने प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा शहरात उपक्रम राबवला. वृक्षरोपे लागवडीतून संघटन वाढवून वॉर्ड तेथे शाखा स्थापन करण्याचा संकल्प जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी केला आहे.

शहरात विविध उपक्रम
भारतीय रीपब्लीकन बहुजन महासंघाच्या माध्यमातून शहरात आनंद बौद्ध विहार, भीमवाडी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान अशा विविध भागात वृक्षरोपांची लागवड करण्यात आली.तसेच संत गाडगे महाराज नगरपालिका रुग्णालयातील रूग्णांना फळे वाटप करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा सचिव संजय सुरळकर, जिल्हा संघटक सचिव प्रवीण आखाडे, शहराध्यक्ष गणेश इंगळे, सचिव किशोर सोनवणे, युवा शहराध्यक्ष विद्यासागर खरात, चेतन सुरवाडे, रीतेश नाईके, बाळा पवार, विद्यानंद जोखदंड, सतीष बिर्‍हाडे, प्रशांत गोरधे, निलेश जाधव, दिनेश नरवाडे, शरद दाभाडे, सागर तायडे, रूपेश साळुंके, तुषार जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी भारीप बहुजन महासंघात अनेक युवकांनी प्रवेश केल्याने त्यांचा जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, बाळा पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

लोकचळवळीचे स्वरूप
आगामी वर्षभरात विद्यार्थी केंद्रीय उपक्रम राबवून वृक्षारोपण उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी प्रभावीपणे जनजागृती केली जाणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी सांगितले.