भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील वैतागवाडी भागातील कुंटणखान्यावर बाजारपेठ पोलिसांनी छापा टाकत एका महिलेची सुटका केली. पोलिसांनी कारवाईदरम्यान कुंटणखाना चालवणार्या महिलेसह आंबटशौकीन ग्राहकास अटक केली आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व बाजारपेठ पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता अचानक दीनदयाल नगरात छापा टाकून देहविक्रय व्यवसाय चालवणार्या महिलेला अटक करून तिच्याविरोधात भाग पाच गुरनं.387/2021 पीटा अॅक्ट कलम-3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला तर एका आंबटशौकीन ग्राहकालाही अटक करण्यात आली.