भुसावळात शाळकरी मुलीचा विनयभंग : एकाविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ : शहरातील श्रद्धा नगर भागातील 14 वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयीत आरोपी राजेंद्र भगवान पाटील (श्रध्दा नगर, भुसावळ) याच्याविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 30 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास अल्पवयीन शाळकरी मुलीचा आरोपीने विनयभंग केल्याने पीडीतेने पालकांना माहिती दिल्यानंतर रात्री उशिरा बाजारपेठ पोलिसात पालकांनी धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिल्यानंतर आरोपीविरुद्ध भादंवि 354, 504, 506 बाललैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका ठाकरे करीत आहे.