भुसावळात शिवसेनेची उद्या बैठक ; विधानसभेच्या व्युहरचनेविषयी होणार चर्चा

0

भुसावळ- शिवसेना रावेर लोकसभा संपर्क प्रमुख विलास पारकर यांच्या नेतृत्वाखाली भुसावल तालुका शिवसेना पदाधिकार्‍यांची बैठक बुधवार, 14 रोजी दुपारी एक वाजता शहरातील शासकीय विश्रामगृहावर होणार आहे. शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, रेल कामगार सेना, वाहतूक सेना, शिक्षक सेना, व्यापारी सेना, ग्राहक संरक्षण कक्ष, दिव्यांग सेना, भारतीय विद्यार्थी सेना व शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी विधानसभा क्षेत्र पदाधिकारी, उपतालुका प्रमुख, उपतालुका संघटक, शहर प्रमुख, शहर संघटक, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख , उपविभाग प्रमुख, गण प्रमुख, गटप्रमुख, बूथ प्रमुख, शाखा प्रमुख व कार्यकर्त्यांनी बैठकीला उपस्थिती द्यावी, असे आवाहन जळगाव जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. या बैठकीस जिल्हा संघटक ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुकाप्रमुख समाधान महाजन आदींची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीत रावेर लोकसभा आणि भुसावळ विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेतर्फे पक्ष वाढीसाठी करण्यात आलेल्या कार्याचा आढावा घेतला जाणार असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी व्युहरचना आखण्यात येणार आहे.