भुसावळ- शहरातील पंधरा बंगला भागात कपडे वाळत टाकताना तारेत करंट उतरल्याने शॉक लागल्याने विवाहिता गंभीर जखमी झाली तर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पत्नीला वाचवताना पतीचा मृत्यू
पंधरा बंगला परिसरातील पद्मावती नगरात नन्नवरे कुटुंबियांचे वास्तव्य आहे. ज्योती नन्नवरे या गुरूवारी सकाळी तारेवर कपडे सुकवण्यासाठी टाकत असताना या तारेत करंट उतरले व त्यांनी आरडा-ओरड केली तर पती रवींद्र रामदास नन्नवरे (वय 40) यांनी धाव घेतली मात्र करंट असलेला तार त्यांच्या हातात आल्याने त्यांचा जागीच दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला. ज्योती यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात रवींद्र नन्नवरे यांचा भाचा किरण मधुकर वाल्हे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.