भुसावळ (गणेश वाघ) : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढणार्या संख्येनंतर जिल्हाधिकार्यांनी 22 फेब्रुवारी ते 6 मार्चदरम्यान रात्री दहा ते पहाटे पाच दरम्यान संचारबंदी जारी करताच पहिल्याच दिवशी भुसावळात पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्यासह पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी पथकासह धडक कारवाईला सुरूवात केली. रस्त्यावर विनाकारक फिरणार्यांसह हॉटेल्स, ढाब्यांची तपासणी करण्यात आली. या कारवाईदरम्यान जामनेर रोडवरील हॉटेल प्रीमीयर प्राईड, फेमस डेअरी चालकासह हॉटेल वैष्णवी चालकावर नियमांचे उल्लंघण केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली.