भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनी भागातील कालिका माता मंदिराजवळ सट्टा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंत बाजारपेठ पोलिसांनी कारवाई करीत संशयीत आरोपी दीपक जयकिसन चेलाणी (42, रा.भुसावळ) यास अटक करण्यात आली. सोमवारी रात्री साडेदहा वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून एक हजार 520 रुपयांची रोकड व सट्टा-जुगाराची साधने जप्त करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व सहा.पोलिस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अयाज सैय्यद, नाईक रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, योगेश माळी आदींनी केली. तपास हवालदार जयराम खोडपे करीत आहेत.