भुसावळात सट्टा खेळताना दोघांना अटक

0

भुसावळ- शहर पोलिस ठाणे हद्दीतील जळगाव नाक्याजवळ पालिकेच्या शौचालयाच्या आडोशाला सट्टा घेताना नितीन नंदू कोटुरवार (रा.गरुड प्लॉट, भुसावळ) यास 18 रोजी सकाळी रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीच्या ताब्यातून 800 रुपयांची रोकड, सट्टा लिहिलेल्या आठ चिठ्ठया आदी जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी निरीक्षक रामकृष्ण कुंभार, शहर पोलिस ठाण्याचे शंकर पाटील , विजय पाटील, संजय बडगुजर, सोपान पाटील, भूषण चौधरी, मोहन पाटील आदींच्या पथकाने केली. तपास पोलिस नाईक शंकर पाटील हे करीत आहेत. दरम्यान, 17 रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास बाजारपेठ हद्दीतील पांडुरंग टॉकीज जवळ रुपलता मेडिकलजवळ मुरलीधर देविदास सोळंके यास मुंबई मटका नावाचा सट्टा घेताना अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 800 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. बाजारपेठ पोलिस देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग, कॉन्स्टेबल समाधान पाटील, कॉन्स्टेबल संदीप परदेशी, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, दीपक पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.