भुसावळात सट्यावर पोलिसांचा छापा ; दोघांना अटक

0

भुसावळ- राष्ट्रीय महामार्गावरील नाहाटा चौफुलीजवळ डीवायएसपी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कार्यालयातील पोलिस कर्मचार्‍यांनी मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास सट्यांचे आकडे घेत असलेल्या तीन जणांवर कारवाई केली. यातील दीपक सोनार हा पसार झाला तर संदीप चौधरी, उमेश रावते यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार हजार 480 रुपये रोख व सट्ट्याची साधने जप्त करण्यात आली. ही कारवाई संकेत झांबरे, विशाल सपकाळे, संदीप चव्हाण यांच्या पथकाने केली. बाजारपेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.