भुसावळात सव्वा लाखांचा गुटखा जप्त

0

बाजारपेठ पोलिसांची कारवाई ; संशयीत ताब्यात

भुसावळ- शहरातील सिंधी कॉलनी भागातील कविता कुकरेजा यांच्या घरात संशयीत आरोपी विशाल उत्तमचंद आहुजा (27) याने गुटख्याचा साठा केल्याची गुप्त माहिती बाजारपेठ पोलिसांना कळाल्यानंतर पथकाने धाड आकून एक लाख 23 हजार 200 रुपयांचा बंदी असलेला विमल पानमसाला व व्ही-1 तंबाखू जप्त करण्यात आली. मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी बुधवारी दुपारी अन्न व औषध प्रशासनाकडून संशयीतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे उपनिरीक्षक मनोज ठाकरे, एएसआय अंबादास पाथरवट , हवालदार छोटू वैद्य, बाळकृष्ण पाटील, सुनील थोरात, दीपक जाधव, समाधान पाटील, सचिन चौधरी, कृष्णा देशमुख, संदीप परदेशी, विनोद वितकर, बंटी कापडणे आदींच्या पथकाने केली.