भुसावळात सव्वा लाखांच्या ऐवजावर चोरट्यांनी मारला डल्ला

0

भुसावळ : शांती नगरातील पालिका कार्यालयासमोरील गणराया कन्ट्रक्शनमधून चोरट्यांनी सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. गोपाळ नगर परीसरात विजय खाचणे यांच्या गणराया कन्ट्रक्शनचे कुलूप चोरट्यांनी गुरूवारी रात्री तोडत काचेचा दरवाजाचा काच तोडल्याने या घटनेत चोरट्यांच्या हाताला जखम झाली असून त्यांच्या जखमेचे रक्त कार्यालयात पडल्याचे दिसून आले. पूजेसाठी ठेवलेली एक तोळ्याची गणपतीची सोन्याची मुर्तीही चोरट्यांनी लांबवत 15 हजारांची रोकड, एक लॅपटॉप, नळ फिटींगचे साहित्य सुमारे 40 हजार रूपये किंमतीचे आणि 10 हजारांचे ब्रेकर्स असा सुमारे 1 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज लांबवला. पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या सूचनेवरून डीबी पथकातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.