भुसावळात साक्षीदारावर प्राणघातक हल्ला, गोलू सावकारे जाळ्यात

0
भुसावळ- खुनाच्या गुन्ह्यात साक्ष देऊ नये म्हणून तक्रारदार व साक्षीदारास धमकावून मारहाण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयीत आरोपी गणेश उर्फ गोल्या उर्फ राजेंद्र सुभाष सावकारे (22, न्यू एरिया वॉर्ड, भुसावळ) यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल व निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील, विकास सातदीवे आदींनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. तपास कॉन्स्टेबल युवराज नागरूत करीत आहेत. आरोपीने धीरज मराठे व राहुल पाटील यांना मारहाण केली होती.