भुसावळात साडी दुकानातून 42 हजारांच्या रोकडसह साड्या लांबवल्या

0

भुसावळ- शहरातील शनि मंदीर वाडॅातील गुरूकृपा साडी सेंटरमधून चोरट्यांनी 22 हजारांच्या रोकडहस 20 हजार रुपये किंमतीच्या साड्या लांबवल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत दुकानाचे मालक संतोष तलरेजा म्हणाले की, दुकानाच्या बाजूला असलेल्या झाडावरून चढून चोरटे गच्चीत आले. तेथे त्यांनी गच्चीस असलेला दरवाजा तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यातील 22 हजारांची रोकड व दुकानातील सुमारे 20 हजार रुपयांच्या साड्याही चोरून नेल्यात. चोरट्यांनी दुकानातील अन्य साहित्याची तोडफोड केली.