भुसावळात साडेचार लाखांची रोकड पकडली

0

फिरत्या पथकाची कारवाई ; रोकड पेट्रोल पंप मालकाची असल्याचा खुलासा

भुसावळ- लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रशासनातर्फे शहरात येणार्‍या प्रमुख मार्गावर नाकाबंदी केली जात असून वाहनांची बारकाईने तपासणी केली जात आहे. शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वाय पॉईंटवर एका चारचाकी वाहनातून नेण्यात येणारी चार लाख 40 हजारांची रोकड भरारी पथकाने जप्त केली. पथकाने या संदर्भात संबंधिताकडून खुलासा मागितला असून आयकर विभागालादेखील याबाबत कल्पना देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ही रक्कम भुसावळ गॅस एजन्सीचे हर्षद जैन यांच्या मालकिची आहे. जैन यांच्या मालकिचा भुसावळातील जळगाव रोडवर पेट्रोल पंप असून शनिवारी बँकेला सुटी असल्याने ही रक्कम घेवून पंपावरील कर्मचारी जळगाव जात असताना पथकाने रक्कम पकडली. दरम्यान, रक्कम पकडण्याच्या बाबीला तहसीलदार महेंद्र पवार यांनी दुजोरा दिला. संबंधितांचा खुलासा याबाबत मागवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.