भुसावळात सामूहिक विवाह सोहळ्यात 46 जोडपी विवाहबद्ध

0

भुसावळ- शहरातील खाटीक बिरादरी यंग ग्रुपतर्फे शहरातील खडका रोडवरील ईदगाह मैदानावर मंगळवारी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यात 46 जोडप्यांचे विवाह लावण्यात आले. या मेळाव्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेशातील सुमारे 15 हजारांवर वर्‍हाडी उपस्थित होते. नव-दाम्पत्यांना आयोजकांतर्फे कुराणाची प्रत भेट देण्यात आली तसेच वर्‍हाडींसाठी आयोजकांनी जेवणाचीही व्यवस्था केली होती. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र अध्यक्ष एल.ए.शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

वेळेसह पैशांची झाली बचत
मुस्लीम खाटीक समाजातील प्रौढ व यंग ग्रूप यांनी एकत्र येत सामूहिक विवाहाबाबत प्रस्ताव मांडल्यानंतर समाजातील मान्यवरांनी त्यास होकार दर्शवल्यानंतर मंगळवारी विवाह सोहळा पार पडला. मुस्लिम खाटीक समाजातर्फे पैसा एकत्र करून हा सोहळा पार पडला. 46 जोडप्यांना विवाहबद्ध करण्यासाठी हाफिज कमरुद्दीन, हाफीज सुलतान, हाफीज अलीमोदिन, हाफीज सदाम, हाफीज अब्दुल हकीम, हाफीज रफिक पटेल, मुक्ती जावेद, मौलाना अनिस, कारी जहीर,मो. जुबेर यांनी निकाहनामा पठण केला. यंग ग्रुप कडून वाहतूक व्यवथा, जेवणावळी, टेंट, बिछाईत, पाण्याची व्यवस्था करण्यात आली. यशस्वीतेसाठी भुसावळ खाटीक बिरादरी यंग ग्रुपच्या सर्व पदाधिकार्‍यांनी परीश्रम घेतले.