भुसावळ: – शहरात बारावी परीक्षेला बुधवारपासून प्रारंभ झाला असलातरी तरी पहिल्याच दिवशी शहरातील दोन विद्यालयातील पाच विद्यार्थ्यांना भरारी पथकाने कॉपी करताना पकडल्याने त्यांना डीबार करण्यात आले. या कारवाईने कॉपी बहाद्दरांमध्ये चांगलीच खळबळ उडाली. शहरात परीक्षेसाठी सहा केंद्र असून तीन हजार 341 विद्यार्थी प्रविष्ट असून बुधवारी तीन हजार 280 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.