भुसावळात सिंधी समाजबांधवांचा चेट्रीचंड शोभायात्रेत जल्लोष

0

भुसावळ- चेट्रीचंड उत्सवानिमित्त शहरातील सिंधी समाजबांधवांतर्फे शनिवारी सकाळी दुचाकी रॅली तर दुपारी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. दहा हजारावर समाजबांधवांनी शोभायात्रेत सहभागी होत जल्लोष केला. सकाळी झूलेलाल मंदिरात पंचामृत स्नान, पूजापाठ व विधीवत कार्यक्रम झाले.

दुचाकी रॅलीने वेधले लक्ष
सकाळी सिंधी समाज बांधवांनी दुचाकी रॅली काढली. झुलेलाल मंदिर, संत कंवरराम पुतळा, सेवा मंडळ, जामनेररोड, मुख्य बाजारपेठ, कपडा मार्कैट, मरिमाता मंदिर, मॉर्डन रोड, स्टेशनरोड, जळगावरोड, मामाजी टॉकीज, पांडूरंग टॉकीज, जामनेररोड व सिंधी कॉलनीत समारोप करण्यात आला. यावेळी अमर शहिद संत कंवरराम चौकामध्ये आमदार संजय सावकारे, माजी नगरसेवक प्रकाश बतरा, व्यापारी अजय नागराणी, चेट्रीचंड उत्सव समितीचे अध्यक्ष पितांबर टेकवानी, उपाध्यक्ष विजयकुमार लोकवानी, अजय माखीजा, जानी मेघाणी, झूलेलाल मंदिराचे ट्रस्टी नारायण छाबडीया, मनोहरलाल सोडाई, पेहलाजराय मुलचंदानी, बालचंद बजाज (शिकारी), नानक बुधरानी, रिंकू चेलानी, प्रताप सीरवानी, जितू माखीजा आदी यावेळी आदी समाजबांधव उपस्थित होते.

शोभायात्रेने वेधले लक्ष
शनिवारी दुपारी एक वाजता सिंधी कॉलनीतून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील जामने रोड, मुख्य बाजारपेठ, मॉर्डर्न रोड आदी भागातून शोभयात्रा निघाल्यानंतर तापी नदीवर बेहराणा साहिबचे विसर्जन करण्यात आले.