भुसावळ- विविध मागण्यांसाठी सेट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे 23 ते 31 ऑगस्ट दरम्यान साखळी आदोंलन डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू करण्यात आले असून पहिल्या दिवशी गुरुवारी आंदोलकांनी तीव्र निदर्शने केली.
अशा आहेत सीआरएमएसच्या मागण्या
देशाला स्वातंत्र्य मिळून 72 वर्ष झाल्यावरही रेल्वेतील पॉईंटसमन व गेटमन यांना अजूनही 12 तासाची ड्युटी दिली जात आहे अन्य कर्मचार्यांना मात्र आठ तासाची ड्युटी असतांना याच कर्मचार्यांच्या बाबतीत दुजाभाव कश्यासाठी असा मुद्दा सीआरएमएसतर्फे उपस्थित केला आहे. वारंवार रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणूनही रेल्वे प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. वारंवार मागणी करूनही रेल्वे प्रशासनाकडून पॉईंटसमन व गेटमन यांच्या कामाच्या वेळेत बदल होत नसल्याने तब्बल नऊ दिवसांसाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
यांचा आंदोलनात सहभाग
मंडळ अध्यक्ष व्ही.के.समाधीया, मंडळ सचिव एस.बी. पाटील, वर्कशॉप मंडळ सचिव पी.एन.नारखेडे, एस.एस.चौधरी, एस.के.दुबे, डी.व्ही.आव्हाड, अभय आखाडे, विकास सोनवणे, किशोर कोलते, ए.एस.राजपूत, राहुल सुरवाडे, सी.आर.उंबरकर आदी उपस्थित होते.