माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी पैलवानांची जोड लावून सी.एम.चषकाला केली सुरुवात
भुसावळ- शहरातील कोरोनेशन क्लबच्या मैदानावर सोमवारपासून सी.एम. चषकाला कुस्ती स्पर्धांनी सुरुवात झाली. माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी मल्लांची जोड लावून ‘स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धेचे’ उद्घाटन केले तर आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे यांनी आखाडा पूजन केले. स्पर्धेसाठी ठिकठिकाणचे मल्ल व त्यांचे समर्थक आले होते. भुसावळ व वरणगावच्या मल्लात झालेली लढत लक्षवेधी ठरली. कुमार व प्रौढ गटात झालेल्या या स्पर्धेतील विजेत्यांना समारोपप्रसंगी बक्षीस देवून गौरवण्यात येणार आहे. दरम्यान, लाल मातीत खेळवण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेत तालुक्यातील वरणगावसह शहरातील सातारा व जाम मोहल्ला, खडका रोड भागातील नामांकित मल्लांनी आपला सहभाग नोंदवला.
कुस्ती स्पर्धेसाठी यांची होती उपस्थिती
कुस्ती स्पर्धेसाठी भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर, अॅड.बोधराज चौधरी, किरण कोलते, सतीश सपकाळे, गिरीश महाजन, प्रमोद सावकारे, परीक्षीत बर्हाटे, किशोर पाटील, पुरूषोत्तम नारखेडे, बापू महाजन, अमोल इंगळे, देवा वाणी, उद्योजक मनोज बियाणी, सुनील महाजन, फेकरी सरपंच निर्मला जावळे, महेश सोनवणे, राजेंद्र चौधरी, इफ्तेकर मिर्झा आदींची उपस्थिती होती. पंच म्हणून पैलवान नामदेव मोरे, दिलीप संगेले, राजकिरण निकम, निश्चल झोपे, चिंतामण सोनवणे, मिलिंद सुरवाडे, सुनील शिंदे, जमील पैलवान आदींनी काम पाहिले. या स्पर्धेत तब्बल ठिकठिकाणी 52 मल्लांनी सहभाग नोंदवत स्पर्धा गाजवली. यशस्वितेसाठी संयोजक अनिकेत पाटील, रवी पाटील, शिवधर दुबे, सुमित बर्हाटे आदींनी परीश्रम घेतले. कुस्ती स्पर्धेचे धावते समालोचन प्रशांत निकम यांनी खास पद्धत्तीने केले. आमदार संजय सावकारे यांनी सी.एम.चषकाचे तालुक्यासाठी आयोजन केले आहे.
23 डिसेंबरपासून क्रिकेट स्पर्धा
शहर व तालुक्यातील स्पर्धकांचा वाढता प्रतिसाद पाहून स्पर्धांची तारीख आयोजकांनी पुढे ढकलली होती. सोमवार, 17 डिसेंबरपसून कुस्ती स्पर्धांनी सी.एम. चषकाला सुरुवात झाली असून या पुढील काही दिवसात कबड्डी, चित्रकला, क्रिकेट, गायन, शंभर व चारशे मीटर धावणे आदी स्पर्धा होणार आहेत. आयोजकांकडून स्पर्धा खेळण्यासाठी जागांची निश्चिती सुरू असून लवकरच त्याबाबत स्पर्धकांना कळवले जाणार आहे. 23 डिसेंबरपासून शहरातील डी.एस.ग्राऊंडवर क्रिकेट स्पर्धांना सुरुवात होण्याची शक्यता असून त्या दृष्टीने मैदानाची डागडूजी केली जात असल्याचे सांगण्यात आले.