भुसावळात सीएम चषक क्रिकेट स्पर्धेत साईजीवन सुपर शॉपीचा संघ ठरला विजेता

0

भुसावळ- सीएम चषक अंतर्गत झालेल्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात साईजीवन सुपर शॉपी सीसीने अली सीसीचा आठ गडी राखून एकतर्फी विजय मिळवत विजेतेपद पटकाविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सीएम चषक अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात 48 संघांनी सहभाग नोंदविला होता. अंतिम सामन्यात अली सीसीने प्रथम फलंदाजी करत 12 षटकार 94 धावा फटकाविल्या यात सुहासने 38 धावा केल्या तर नासिर 3 व नदीमने 2 बळी घेतले व साईजीवन सुपर शॉपीला 95 लक्ष दिले. त्याचा पाठलाग करताना साईजीवन सुपर शॉपीने सामना सातव्या षटकातच जिंकला. यात फकरूद्दिन 35 तर तौसीफने मे 42 धावा काढल्या. सामना साई जीवनने आठ गडी राखून जिंकला.

विविध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान
तत्पूर्वी सीएम चषक अंतर्गत झालेल्या कबड्डी स्पर्धेतील विजयी मातृभूमी मंडळ, उपविजयी ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव, महिला गटात सतेज संघ भुसावळ- प्रथम, टीट्युड संघ द्वितीय, तसेच महिला क्रिकेट, चित्रकला, अ‍ॅथलेटिक्सस्पर्धेतील विजेत्यांना खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, प्रा.डॉ.सुनील नेवे, समाजसेवक प्रमोद सावकारे, निर्मल कोठारी, देवा वाणि, गिरीश महाजन, पवन बुंदेले, पुरुषोत्तम नारखेडे, किशोर पाटील, शैलजा पाटील, प्रशांत नरवाडे, प्रशांत निकम यांच्या हस्ते मेडल, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. क्रिकेट स्पर्धेसाठी फकृद्दिन, अर्षद सैय्यद, तोसिफ मिर्झा, अँडी, नदीम शेख, निलेश वारके, नदीम शेख, समालोचक म्हणून रमजान पटेल तर क्रिकेट स्पर्धेचे आयोजक म्हणून अनिकेत पाटील यांनी काम बघितले. क्रिकेट स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हा टेनिसबॉल क्रिकेट संघटनेचे सचिव वासेफ पटेल यांनी सहकार्य केले.