ऑनलाइन तथा ऑफलाईन निशुल्क प्रवेश प्रक्रियेला सुरूवात
भुसावळ- भारतीय जनता पक्षाच्या सीएम चषकासाठी भुसावळ विधानसभा मतदारसंघात जोरदार तयारी सुरू झाली आहे. 30 ऑक्टोबर ते 12 जानेवारी 2019 दरम्यान होणार्या या ‘सीएम चषक’ क्रीडा महोत्सवासाठी ऑनलाइन तथा ऑफलाईन निशुल्क प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सीएम चषक महोत्सवासाठी भुसावळ तालुक्यात नुकतीच आढावा व नियोजन बैठक घेण्यात आली.
यांची होती उपस्थिती
आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा संघटण सरचिटणीस प्रा. सुनील नेवे, मुख्य संयोजक तथा भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिकेत पाटील, भाजपचे शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, सुमित बर्हाटे आदींसह 21 पदाधिकार्यांच्या आयोजन समितीमधील कार्यकर्ते उपस्थित होते. क्रीडा महोत्सवामध्ये अधिक युवा खेळाडू सहभागी व्हावेत यासाठी जोरदार प्रयत्न केला जात आहे. या स्पर्धेत 18 वर्षांखालील खेळाडू मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, यासाठी व्यापक नियोजन केले जात आहे. शहरी भागातील प्रत्येक वॉर्डासह ग्रामीण भागात या स्पर्धा टप्प्याटप्प्याने होणार आहेत. सीएम चषक स्पर्धेत क्रिकेट, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, अॅथलेटिक्स, कुस्ती, कॅरम आदींसह विविध खेळांचा समावेश राहणार आहे.
खेळनिहाय संयोजकांची निवड
खेळनिहाय संयोजकांची निवड करण्यात आली असून त्यात तालुका मुख्य संयोजक अनिकेत पाटील, सहसंयोजक पृथ्वीराज पाटील, प्रचार संयोजक प्रशांत नरवाडे, नोंदणी संयोजक हिमांशु दुसाने तर खेळनिहाय संयोजक असे – आकाश भोळे (क्रिकेट), किशोर पाटील (कबड्डी), शिवधर दुबे (कुस्ती), देवेंद्र वाणी (400 मिटर धावणे), प्रा. प्रशांत पाटील (गायन), मुकेश खपली (नृत्य), स्वाती शेळके (कविता गायन), मिना लोणारी (रांगोळी स्पर्धा ), मधुकर वाणी (व्हॉलीबॉल), नदीम शेख (कॅरम), स्वराज पाटील (100 मिटर धावणे), महेश चौधरी (चित्रकला), राजू कुलकर्णी (खो-खो), प्रवीण वारके (मॅरेथॉन) यांची निवड करण्यात आली.
ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीस सुरुवात -अनिकेत पाटील
संकेतस्थळावर ऑनलाइन तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानाजवळील खासदार रक्षा खडसे यांच्या संपर्क कार्यालयात ऑफलाईन पध्दतीने नावे नोंदणी करता येणार आहे. शहरासह तालुक्यातील खेळाडूंनी संपर्क साधावा. या स्पर्धेत प्रवेश निशुल्क राहिल तसेच शाळांच्या विद्यार्थ्यांनीही शाळांमधून नोंदणी करावी, अस आवाहन सीएम चषकाचे मुख्य संयोजक अनिकेत पाटील ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना म्हणाले.