भुसावळात सीएम चषक स्पर्धा पुढील आठवड्यात होणार

0

भुसावळ- शहरात रविवार, 11 रोजी होणारी सीएम चषकाची कुस्ती स्पर्धा खेळाडूंच्या मागणीवरुन एका आठवड्यासाठी पूढे ढकलण्यात आली आहे. सर्व खेळ आणि स्पर्धेसाठी ऑनलाइन रजिष्ट्रेशनची मुदत वाढवून मिळावी, यासह अधिकाधिक खेळाडूंना सहभागी होता यावे, अशी मागणी समोर आल्याने हा निर्णय घेण्यात आला. शाळा, महाविद्यालय दिवाळी सुट्यानंतर सुरू झाल्यावर या सांघिक खेळाचा प्रतिसाद वाढेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात होती. यामुळे सीएम चषकातील कुस्तीचे सामने रविवार ऐवजी आठवड्याभराने होणार आहेत. वाढीव मुदतीचा फायदा घेवून अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन सीएम चषकाचे मुख्य संयोजक तथा भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिकेत पाटील यांनी केले आहे.