शिवसेनेच्या 54 व्या वर्धापनदिनानिमित्त उपक्रम
भुसावळ : शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रेल्वे स्टेशन पराीसरात येणार्या-जाणार्या प्रवाशांसह नागरीकांना कोरोना संक्रमणापासून दिलासा मिळण्यासाठी सॅनिटायझर मशीन लावण्यात आले असून त्याचे लोकार्पण शुक्रवारी सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अॅड.जगदीश कापडे यांच्याहस्ते करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या प्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख अॅड.श्याम गोंदेकर, शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, नगरसेवक तथा सी.ए.दिनेश राठी, युवा सेना तालुका प्रमुख हेमंत बर्हाटे, ज्येष्ठ शिवसैनिक दिवाकर विसपुते, शिव वाहतूक सेनेचे हेमंत खंबायत, अमोल भालेराव, मिलिंद कापडे, धीरज वरदोनकर, हिंगने काका, माजी विभागप्रमुख उमाकांत (नमा) शर्मा आदी शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक असून शहरवासीयांच्या कठीण काळात कामाला येणे हे आमचे कर्तव्यच असून हे शिवसैनिकच करू शकतो, अशी भावना उमाकांत (नमा) शर्मा यांनी व्यक्त केली. दरम्यान, मशीनचे लोकार्पण लक्ष्मी चौक येथे शिवसेना उपजिल्हा प्रमुख अॅड.श्याम गोंदेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी नमा शर्मा यांच्या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.