भुसावळात सेवानिवृत्त कर्मचार्‍यास मारहाण झाल्याचा आरोप

0

भुसावळ : पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी देविदास पंढरीनाथ सपकाळे यांना पालिकेचे मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी शनिवारी दुपारी मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीनंतर कर्मचार्‍यास पालिकेच्या कक्षात बंद केल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी त्यास ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.

सपकाळे हे पालिकेत लिपिक पदावर असताना त्यांनी पेन्शन विक्री केली व त्यापोटीचे पैसे मिळत नसल्याने पालिकेकडे तगादा लावला होता. शुक्रवारी त्यांनी पालिकेत पैशांची मागणी केल्यानंतर मुख्याधिकार्‍यांनी त्यांना मारहाण केली, असा आरोप त्यांनी केला तर मुख्याधिकार्‍यांनी मात्र आरोप खोटा व बिनबुडाचा असल्याचे सांगत संंबंधित नेहमीच पालिकेत येऊन शिवीगाळ व आरडा-ओरड करीत असल्याचे सांगत याबाबत तक्रार देणार असल्याचे सांगितले.