भुसावळात सेवानिवृत्त कर्मचार्याचा मोबाईल लांबवला

0

भुसावळ- शहरातील दत्त नगरातील रहिवासी व सेवानिवृत्त कर्मचारी लिलाधर एकनाथ दोडके यांना मारहाण करीत त्यांच्या ताब्यातील 13 हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबवण्यात आल्याची घटना 16 रोजी रात्री 11.55 वाजेच्या सुमारास घडली. अष्टभूजा मंदिरासमोरील मोदरकर डेपोमागून दोडके हे जात असताना संशयीत आरोपी यश शरद शरद सोळंके व त्याच्या सोबतच्या अन्य एका अनोळखी ईसमाने (रा.खंडवा, मध्यप्रदेश) याने मोबाईल लांबवल्याचे तक्रारीत नमूद आहे. तपास पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार युवराज नागरूत करीत आहेत.