तहसीलदारांना निवेदन ; दुष्काळात गरीबांचे जगणे झाले कठीण
भुसावळ- शहरातील पंचशील नगर भागातील स्वस्त धान्य लाभार्थींना मे महिन्यात स्वस्त धान्य न मिळाल्याने त्यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार करीत दखल घेण्याची मागणी केली आहे. स्वस्त धान्य दुकान क्रमांक 39/2 चे चालक शेखर पगारे यांनी लाभार्थींना केवळ तीन पोते गहू व दोन पोते तांदूळ आल्याचे सांगून स्वस्त धान्य वितरणास असमर्थता दखवल्याने लाभार्थींना दखल घ्यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे केली आहे. आधीच तालुका दुष्काळी जाहीर झाला असून वाढत्या महागाईत गरीबांना जगणे कठीण झाले असल्याचे निवेदनात नमूद आहे.
निवेदनावर यांच्या स्वाक्षर्या
राजू डोंगरदिवे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. निवेदनावर नितेश डोंगरदिवे, राजू राऊत, किशन अहिरे, जाकीर शे.अब्दुल रज्जाक, कैलाश गोसावी, शबाना शे.सलीम, शे.सलीम शे.इब्राहीम, जावेदा बी.सलीम खाटीक, रऊफ पटेल, आकाश विरघट यांच्यासह सुमारे 83 लाभार्थींच्या निवेदनावर स्वाक्षर्या आहेत.