भुसावळात स्वाईन फ्लुचा रुग्ण आढळला

0

जळगाव। भुसावळात स्वाईन फ्लुचा रुग्ण आढळला असून जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. शहरातील सिंधी कॉलनी येथील दीपा खुशलानी (वय 47) या महिलेला सर्दी व खोकल्याचा त्रास होता.हा त्रास सुरू झाल्या पासून त्यांनी परिसरातील डॉक्टरांकडून औषोधपचार केले परंतु औषधांचा प्रभाव पडत नसल्याने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.त्यानुसार गेल्या 6 दिवसांपासुन त्यांच्यावर ऑर्किड रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती ठिक आहे.

दीपा यांच्यात स्वाईन फ्लुची लक्षणे दिसत असल्याने त्यांच्यावर पहिल्या दिवसापासूनच उपचार सुरू करून लागलीच रक्ताचे नमुने मुंबई येथे तपासणी साठी पाठविण्यात आले. दिड दिवसात रक्त तपासणीचा अहवाल येवून एच वन एन वन इन्फ्लुएन्झा व्हायरसची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आजरोजी तीची प्रकृती ठिक आहे.

यापुर्वी भुसावळ येथील सुजन ब्रिच स्टर्जन या महिलेस स्वाईन फ्लुची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले होते. तीच्यावर सुध्दा याच रुग्णालयात उपचार करण्यात आले असून ती पुर्णपणे बरी होवून मागील आठवड्यात घरी गेली आहे. सुजन ही 27 जूनला मुंबईला गेली होती. तेथून आल्या नंतर तीला 3 जुलैला त्रास झाला होता. तर दीप ही बाहेर गावी गेली नव्हती परंतु ती गर्दीच्या ठिकाणी गेली होती.

स्वाईन फ्लु हा हवेतुन पसरणारा आजार आहे.वातावरणातील बदला मुळे इन्फ्लुएंझा एचवन एनवन शेरोवाईल व्हायरस पसरत असतो.ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमी आहे. अशा लोकांना त्याची लवकर लागण होते. 5 वर्षापेक्षा कमी वयाची बालके, गरोदर महिला व मधुमेहाचे रुग्ण यांना लागण होण्याची शक्यता अधिक असते.सर्दी, खोकला दोन ते तीन दिवसात ठिक न झाल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
डॉ. रवि कुकरेजा, ऑर्किड रुग्णालय