भुसावळात हद्दपारीचे उल्लंघण ; एकास अटक

0

भुसावळ- गुन्हेगारी पार्श्‍वभूमीमुळे दोन वर्षांसाठी हद्दपार केल्यानंतरही शहरात संशयीत आढळल्याने त्यास बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. प्रशांत उर्फ मुन्ना संजय चौधरी (28, पंढरीनाथ नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. बाजारपेठ पोलिस गस्तीवर असताना जामनेर रोडवरील हॉटेल रंगोलीसमोर रविवारी रात्री संशयीत आढळल्याने त्याच्याविरुद्ध रवींद्र शांताराम तायडे यांनी फिर्याद दिल्यावरून भादंवि 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.