भुसावळ :- गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आरोपी शहरात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून त्यास अटक करण्यात आली. प्रशांत ताराचंद सोनवणे (आंबेडकर नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना संशयीत गावात आल्याची माहिती मिळाली होती त्यावरून त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी एएसआय मुरलीधर आमोदकर, रवींद्र पाटील, महेंद्र पाटील, युनूस शेख, दीपक पाटील आदींच्या पथकाने अटक केली.