तीन दिवस नाट्य रसिकांना नाटकांची मेजवाणी ; पाच प्रायोगिक नाटकांचे सादरीकरण
भुसावळ- उत्कर्ष कलाविष्कारतर्फे स्व.नानासाहेब देविदास गोविंद फालक स्मृती प्रायोगिक खान्देश नाट्यमहोत्सवाची पर्वणी मध्य रेल्वेच्या श्रीकृष्णचंद्र सभागृहात 1 ते 3 जून दम्यान भुसावळातील नाट्यरसिकांना मिळणार आहे. तीन दिवसात पाच प्रायोगिक नाटके सादर करण्यात येणार आहेत. महोत्सव यशस्वीतेसाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. नाट्य महोत्सवाअंतर्गत 1 जून रोजी सायंकाळी 7.45 वाजता परिवर्तन चित्र साक्षरता प्रदर्शनाचे उद्घाटन राधेश्याम लाहोटी यांच्या हस्ते होईल.
या नाटकांचे होणार सादरीकरण
पहिल्या दिवशी होणार्या नाटकास प्रमुख अतिथी म्हणून राजू बाविस्कर विकास मल्हारा व शंभू पाटील उपस्थित राहतील. 1 रोजी रात्री आठ वाजता ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक यांच्या हस्ते नाट्य महोत्सवाचे उद्घाटन होईल. त्यानंतर लगेचच ‘बाप हा बाप असतो’ हे नाटक सादर होईल. 2 रोजी सायंकाळी सहा वाजता राजू बाविस्कर व विजय मल्हारा या चित्रकारांची मुलाखत विजय जैन घेणार आहेत. रात्री 8 वाजता ‘जनक’ हे नाटक सादर होईल. 3 रोजी सकाळी 10 वाजता ‘दगडा शिकव धडा’ व 11 वाजता ‘पुस्तक एके पुस्तक’ अशी दोन बालनाट्ये सादर होतील. सायंकाळी सहा वाजता पंचक्रोशीतील खान्देशात नाटक रुजविण्यात नव नाटककारांची जबाबदारी या विषयावर नाट्य चर्चा रंगणार आहे. यात खानदेशातील नव नाटककार सहभागी होणार असून सूत्रसंचालन योगेश पाटील करतील. रात्री 8 वाजता ‘चार दिवस प्रेमाचे’ हे नाटक सादर होणार आहे.
नाट्य महोत्सवासाठी समित्यांचे गठण
नाट्यमहोत्सव यशस्वीतेसाठी समित्या गठीत करण्यात आल्या. त्यात केंद्रीय समिती अध्यक्ष मोहन फालक, सदस्य राधेशाम लाहोटी, बद्रीनारायण अग्रवाल, श्रीकुमार चिंचकर, सुरेश पाटील, डॉ. आशुतोष केळकर, सोनू मांडे, संदीप सुरवाडे, संजय चांडक, हर्षद महाजन, डॉ. विनायक महाजन, विलास चौधरी, प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, प्रा. जतीन मेढे, सत्यपालसिंग राजपूत, वैद्य रघुनाथआप्पा सोनवणे, सविता अग्निहोत्री, प्रिया पाटील, जयश्री पुणतांबेकर यांच्यासह
दीनानाथ ओगले, सुधीर पटवे, रमण इंगळे, मुकेश फिरके, अनिल कोष्टी. स्वागत समिती अध्यक्ष डॉ. दिलीप देशमुख, सदस्य रचना महाजन, अमोल दांदळे, तुषार चिंधळे, रोहिणी पालवे. प्रसिद्धी समिती अध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, सदस्य प्रा. श्रीकांत जोशी, प्रा. पंकज पाटील, नयन पवार, धनश्री जोशी, नरेंद्र कोतुरवार, डॉ. योगेश पाटील. रंगमंच व्यवस्था समिती अध्यक्ष धर्मराज देवकर, सदस्य कुंदन तावडे, उमेश गोरधे, विजय ठाकरे, श्रीकांत कुलकर्णी, अक्षय नेहे. निवास समिती अध्यक्ष योगेश गाडगीळ, देवेश कुलकर्णी, तेजस जोशी, संजय चव्हाण, रवींद्र कोळी. भोजन समिती अध्यक्ष श्रीराम पाटील, सदस्य पुष्कराज शेळके, दीपक नाईक, सुशील पाटील. प्रेक्षागृह समिती अध्यक्ष प्रकाश चौधरी, सदस्य रविकांत सुपेकर, एस. बी. सोनवणे, स्वरदा गाडगीळ. ध्वनी व प्रकाश योजना समिती अध्यक्ष किरण बाविस्कर, सदस्य प्रथमेश जोशी, पद्मिनी पाटील, श्वेता पाठक, जयश्री भारंबे आदींचा समावेश आहे.