भुसावळ : शहरात प्रथमच अपर पोलीस महासंचालक सुरेंद्र सिंह हे भेट देणार असल्याने पोलीस दलात तयारीला वेग आला आहे. अपवादात्मकरीत्या मुंबई अपर महासंचालक हे भेट देत असल्याने या भेटीला विशेष महत्व आहे. जिल्हा दलाच्या वार्षिक तपासणीसाठी सिंह येत असल्याने बाजारपेठ पोलीस ठाण्यात रंगरंगोटी करण्यात येत आहे. जामनेर रोडवरील उपअधीक्षक कार्यालयासह तालुका पोलीस ठाण्याच्या इमारतीत पाहणी करतील.