भुसावळात 16 रोजी ऑलम्पिक स्पर्धा

0

भुसावळ – एन.के.नारखेडे इंग्लिश मिडीयम स्कुल व भुसावळ रोटरी क्लब रेलसिटीच्या सहकार्याने शहरातील रेल्वे पटांगणावर 16 रोजी ऑलम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. रनिंग, रिले रेस, गोळाफेक, भालाफेक, लांब उडी, उंच उडी, हर्डल तसेच बैठ्या खेळांमध्ये चेस व कॅरम आदी खेळ खेळले जातील. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासह खेळाडूंमध्ये सांघीक भावना वाढून त्यांच्या कलागुणांचा विकास करण्यासाठी 14 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली असल्याचे पत्रकार परीषदेत सांगण्यात आले.