भुसावळात 169 मंडळे करणारे दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना

0

आज घटनास्थापना ; रात्री उशिरापर्यंत चालली सजावटीची कामे

भुसावळ- शहरातील विविध भागात 169 सार्वजनिक मंडळांतर्फे बुधवारी दुर्गामुर्तींची स्थापना होणार आहे. मंडळाच्या पदाधिकार्‍यांची तयारी पूर्ण झाली असून पोलिस प्रशासनाने बंदोबस्ताची आखणी केली. बुधवारपासून सुरू होत असलेल्या उत्सवामुळे शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होती, घट घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. पूजेचे साहित्य घेण्यासाठी महिला भाविकांनी गर्दी केली होती. शहरातील देवीच्या मंदीरावर रोषणाई करण्यात आली आहे. मंदीरांना रंगरंगोटी केली आहे. नवरात्रोत्सवानिमीत्त शहरातील सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर सफाई करण्यात आली आहे. दरम्यान, शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 80 तर बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दित 89 मंडळांतर्फे दुर्गा स्थापना केली जाणार आहे. शहरातील विविध मंडळांनी दांडिया, गरबा रासचे आयोजन केले आहे.